Uncategorized
महाविकास आघाडी सरकार आरक्षण विरोधी; माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची टीका
संजय राठोड, यवतमाळ | राज्यातील महाविकास आघाडी सरकार आरक्षण विरोधी असल्याचा घणाघाती आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. तसेच आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा देखील राठोड यांनी दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयात आरक्षणासंदर्भात 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात भटक्या विमुक्तांना देण्यात आलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे. संविधानानुसार भटक्या विमुक्तांना आरक्षण दिले आहे. त्यात काहीही गैर नाही, असे असताना राज्य सरकार आरक्षण विरोधी भूमिका घेत आहे.
ओबीसी, मराठा, एससी, एसटी कुणालाही आरक्षण द्यायचे नाही, अशी भूमिका घेणारे महाविकास आघाडी सरकार आरक्षण विरोधी आहे, असा घणाघाती आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राठोड यांनी दिला आहे.