माझी चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे गृहमंत्र्यांना खुलं आव्हान
मनसुख हिरेन आत्महत्येचा तपास NIA करत आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब फडणवीसांनांनी वाचून दाखवला. यावेळी देवेंद्र फडणवीसांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) कसे मिळाले, त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्याच प्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबले गेले असे देखील आरोप करण्यात आले. उत्तरादाखल माझी चौकशी करा, असे खुलं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांना केले.
तर या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात केलेल्या आरोपांमुळे सत्ताधारी पक्षाची कोंडी झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात हिरेन मनसुख यांची पत्नी विमला मनसुख यांच्या तक्रारीची प्रत आणि कॉल डिटेल्स रेकॉर्डच्या आधारे या प्रकरणातील तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. उपलब्ध पुरावे हे सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना बडतर्फ करून त्यांचा तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. मुळात देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) कसे मिळाले, त्यांना ते मिळवण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस मी सीडीआर मिळवला, सरकारने माझी चौकशी करावीच, पण खून केला त्याला पाठिशी का घालता ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.