महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात युवा सेना आक्रमक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार येथे नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
नंदुरबार शहरातील अंधारे चौकात शिवसैनिकांनी आज नारायण राणे यांच्या विरोधात घोषणा देत यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा ,अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष अर्जुन मराठे ,व शिवसैनिक उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.