महाराष्ट्र
सचिनपाठोपाठ युसूफ पठाणही कोरोना पॉझिटिव्ह
सचिन तेंडुलकरपाठोपाठ आता क्रिकेटपटू युसूफ पठाणलाही कोरोना संसर्ग झाला आहे. युसूफनं स्वत: टि्वट करत याची माहिती दिली आहे. शनिवारी दुपारी सचिन तेंडुलकरला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर रात्री युसूफनं त्याला लागण झाल्याचं सांगितलं.
'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. मी आवश्यक ती सर्व खबरदारी आणि औषधं घेतली आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो, असं युसूफनं ट्विट करून सांगितलं.
सचिनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टि्वट करून माहिती दिली होती. तसंच आपण होम क्वारंटाइनमध्ये असल्याचंही सांगितलं होतं.