मैदानी खेळाकडे तरुणांनी वळावे-माजी नगराध्यक्ष लोळगे

मैदानी खेळाकडे तरुणांनी वळावे-माजी नगराध्यक्ष लोळगे

कबड्डी हा मैदानी व रांगडा खेळ आहे. त्यातून शारीरिक व मानसिक सुदृढता लाभते.
Published by :
shweta walge
Published on

सुरेश वायभट/पैठण; कबड्डी हा मैदानी व रांगडा खेळ आहे. त्यातून शारीरिक व मानसिक सुदृढता लाभते. मुलांनी मोबाईलपासून दूर राहून मैदानी खेळाकडे वळावे, असे आवाहन माजीनगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी केले. ते वडवाळी येथे कबड्डी स्पर्धे उदघाटनप्रसंगी बोलत होते.

पैठण तालुक्यातील वडवाळी येथिल वडवाळनेश्वर क्रिडा व सांस्कृतीक मंडळ संचालित वडवाळी येथे 65 किलो गटामध्ये भव्य कबाड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या हास्ते करण्यात आले.यावेळी लक्ष्मण औटे, अॅड जनाबाई औटे, सायरा पठाण, नंदा नागरे, लक्ष्मण सपकाळ, अशोक बर्डे, लक्ष्मण महाराज खोपडे, रामराव मैंदड, बापुराव साळुंखे, परसराम खोपडे, अमेर शेख, योगेश पाचे, पंकज गायकवाड, शेख शाहमद, शिवाजी पाचे भरत पाचे, अनिल वायभट, मनोज नालकर, गोविंद जाधव, संभाजी धरम यांच्यासह खेळाडूंची उपस्थिती होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com