कोरोनामुळे नोकरी गमवलेल्या तरुणाने सुरू केले कुक्कुटपालन
पैठण तालुक्यातील खेर्डा गावचा अमोल कर्डिले प्राध्यापक म्हणून नोकरीस लागला होता . पण कोरोनामुळे नोकरी गेली खिशात पैसे नाहीत . बैंक कर्ज देत नाही . अशा विकट परिस्थितीत मित्रपरिवारांकडून मदत घेऊन त्याने कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला . गावरान अंड्याला प्रतिनग 15 रुपये भाव मिळत असून दररोज 100 ते 150 अंड्यांची विक्री केली जाते . तसेच गावरान कोबड्यांची विक्री करून चांगले उत्पन्न अमोल मिळवतो . शेतात राबून , अमोलने एमए , बीएड केले . औरंगाबाद येथील खाजगी संस्थेत तो प्राध्यापक म्हणून नोकरीस लागला . मात्र लॉकडाऊनच्या काळात शाळा , महाविद्यालये बंद पडली. यामुळे इतर शिक्षकांप्रमाणे अमोललाही घरी बसावे लागले .मगशेतीवशेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देत कुक्कूट पालन व्यवसाय सुरु केला आज त्याच्याकडे 200 कोबड्या असून त्यापासून दररोज 100 ते 150 अंडयांचे उत्पादन मिळते . सध्या मागणीही चांगली असून १५ रुपयांपर्यंत प्रतिनग दर मिळतो .