आठवी पास तरुणाने तयार केलं हेलिकॉप्टर; उड्डाण घेताना नशिबानं केला घात

आठवी पास तरुणाने तयार केलं हेलिकॉप्टर; उड्डाण घेताना नशिबानं केला घात

Published by :
Published on

यवतमाळमध्ये आठवी पास तरुणाने हेलिकॉप्टर बनवले होते. या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची चाचणी करताना अपघात होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम असे त्याचे नाव होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून यवतमाळच्या रँचो गमावल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

यवतमाळमधील महागाव तालुक्यातील फुलसावंगीचा रहिवाशी असलेल्या पत्राकारागीर असलेल्या शेख इस्माईलने दोन वर्षे कठोर परिश्रम करून स्वतःच हेलिकॉप्टर बनविले. १५ ऑगस्टला शेख इस्माईल हे हेलिकॉप्टर आकाशात उडविणार होता. त्यासाठी मंगळवारी रात्री त्याचा सराव सुरू होता. या दरम्यान हेलिकॉप्टरच्या मागील बाजूचा पंखा तुटला व तो मुख्य पंख्यावर येऊन आदळला. हा मुख्य पंखा शेख इस्माईलच्या डोक्यावर आदळला. यात तो जागीच गतप्राण झाला.शेख इम्माईलच्या पश्चात वृद्ध वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. शेख इस्माईलचे गावाचे नाव जगभर पोचविण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील नागरीकांनी फुलसावंगी गावात धाव घेतली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com