Yashomati Thakur
Yashomati Thakur

यशोमती ठाकूर यांचं मुख्यमंत्री पदावरून मोठं वक्तव्य, 'शरद पवार मुख्यमंत्री असते तर...'

Published by :
Published on

सुरज दहाट, अमरावती | महिला व बालविकास मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur ) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठ विधान केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राच चित्र जरा वेगळं असतं, अशाप्रकारचं विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीत धुसफुस सुरू असल्याच्या चर्चांना पुन्हा ऊत आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं, छोटा मुह बडी बात म्हणत शरद पवार साहेब आपण जर मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळे असते असे मोठं विधान मुख्यमंत्री पदावरून त्यांनी केलं, यशोमती ठाकुर (Yashomati Thakur ) यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबद महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफुस दिसुन आली. भर सभेत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur ) यांनी मुख्यमंत्री पदाबाबद वक्तव्य केल्याने राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com