कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांसाठी ‘मिशन वात्सल्य’

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांसाठी ‘मिशन वात्सल्य’

Published by :
Published on

कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'शासन आपल्या दारी' या संकल्पनेवर आधारित 'मिशन वात्सल्य' योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते.

त्यानुसार याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. या योजने मार्फत सर्वांना आधार मिळेल असा विश्वास यशोमती ठाकूर यांना आहे. तर अमरावती जिल्ह्यातील सुरू झालेली योजना राज्यभर सुरू झाल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com