Coronavirus Variant Xe Reported
Coronavirus Variant Xe Reported

धक्कादायक! मुंबईत आढळला XE उपप्रकारचा कोरोना रुग्ण

३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणीत ‘ओमायक्रॉन’चे २२८ अर्थात ९९.१३ टक्के रुग्ण आढळले.
Published by :
Published on

मुंबईत नुकतचं मास्क मुक्तीसह सर्व निर्बंध हटवल्याचे प्रशासनाने जाहीर केले असतानाच आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE आणि Kappa चे मुंबईत रुग्ण आढळून आले आहे. XE व्हेरिएंटचे हे देशातील पहिले प्रकरण आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसह, आरोग्य विभाग आणि देशाची चिंता वाढली आहे.

https://twitter.com/ANI/status/1511675896419471367बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या (BMC) कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अकराव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २३० रुग्ण हे मुंबई महानगरातील (BMC) नागरिक आहेत. यात ‘ओमायक्रॉन’ (Omicron) चे २२८ अर्थात ९९.१३ टक्के रुग्ण आढळले आहेत. उरलेल्या दोन बाधितांपैकी एक जण ‘कापा’ उपप्रकाराने तर अन्य एक जण ‘एक्सई’ उपप्रकाराने बाधित होता, असे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे आरोग्य विभाग पुन्हा अलर्ट मोडवर आला आहे.

ब्रिटनमध्ये आढळला होता रूग्ण

‘ब्रिटनमध्ये एक्सई हा विषाणूचा उपप्रकार जानेवारीमध्ये आढळला आहे. जगभरात या विषाणूचे ६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. हा विषाणू ओमायक्रॉनचे बीए.१ आणि बीए.१ या उपप्रकाराचे उत्परिवर्तन होऊन निर्माण झाला आहे. यामध्ये बीए.१ आणि बीए.२ जनुकीय घटकांचे मिश्रिण झाल्याचे आढळले आहे. बीए.१ आणि बीए.२ हे दोन्ही उपप्रकार देशभरात करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आढळत आहेत. त्यामुळे यांचेच गुणधर्म असलेल्या नव्या विषाणूपासून सध्या कोणताही धोका आहे असे वाटत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com