महागाईचा विरोध करत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची सायकल रॅली
कोरोना टाळेबंदी नंतर देशात मोठ्या प्रमाणात महागाईने उच्चांक गाठला आहे. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा काँग्रेसने आरोप केलाय, तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे.पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.त्यामुळे याचा अमरावतीत काँग्रेसने निषेध करत विभागीय आयुक्त कार्यालयावर या महागाईविरोधात सायकल रॅली काढली,
यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषद कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय दरम्यान सायकल रॅली काढली या वेळी मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली, "मोदी तेरी तानाशाही नही चलेगी" अशा घोषणा देण्यात आल्या,यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका करत देशाला जर वाचवायचा असेल तर केंद्र सरकारला हटवा असं यशोमती ठाकूर यांनी सांगितले.