crime
crimeTeam Lokshahi

प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर नको त्या अवस्थेत मोबाईल शूट केलं, मग सुरू झाली खंडणी वसुली

दहा लाखाची खंडणी उकळणाऱ्या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Published on

अनिल साबळे | औरंगाबाद : तरुण अभियंत्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीर संबंध ठेवले व नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दहा लाखाची खंडणी उकळणाऱ्या टोळीला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे यातील एक आरोपीने मुंबई क्राईम ब्रांचमध्ये अधिकारी असल्याचं सांगत धमकावल्याचेही स्पष्ट झाले आहे.

crime
अविश्वास ठराव म्हणजे फुसकी बॉम्ब; बावनकुळेंची टीका

औरंगाबाद शहरातील सातारा आणि परिसरामध्ये एक 27 वर्षीय इंजिनियर राहत होता. एका तरुणीने त्याच्यासोबत जवळीक केली. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तोही एवढा गुंग झाला की त्याच्यावर लावलेला हा हनीट्रॅप आहे याची त्याला जाणीवही झाली नाही. पुढे या प्रकरणात संजय जाधव नावाच्या व्यक्तीची एंट्री झाली. त्या इंजिनियर तरुणाला संजय जाधव आणि तरुणी बलात्कराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ लागले व पैशांची मागणी करू लागले.

crime
अजित पवारांनाच अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाची माहिती नाही; शिंदे गटाने लगावला टोला

संजय जाधव 19 डिसेंबर रोजी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तुमच्या ऑफिसचे पार्सल आहे, असे म्हणून भेटले. तिथे एका या व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रांचला पीआय प्रदीप घुगे असल्याचं सांगत कारमध्ये बसायला सांगितलं. एका हॉटेलमध्ये तरुणी, संजय जाधव, प्रतीक जाधव, अक्षय आणि नसीर पटेल याने तरूणाला मारहाण केली. तरुणाच्या खिशात असलेले चाळीस हजार तीनशे रुपये घेतले. त्याच्या जवळ असलेली बुलेट गाडी हिसकावून घेतली आणि दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com