मुंबईत नाइट कर्फ्यू लागणार का ? महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

मुंबईत नाइट कर्फ्यू लागणार का ? महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

Published by :
Published on

मुंबईत पुन्हा कोरोना डोक वर काढताना दिसतोय. दररोज विक्रमी रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याने शहरात पुन्हा कोरोनाचा संसर्ग गडद होताना दिसतोय. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी प्रशासन लॉकडाऊन अथवा नाइट कर्फ्यू लागू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना या कर्फ्यू ची भीती सतावत असताना यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

राज्यात बुधवारी 23 हजार 179 इतकी रुग्णसंख्या आढळली आहे, तर मुंबईत 2 हजार 377 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळं मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 49 हजार 974 इतकी झाली आहे. त्यामुळे राज्यासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसतो आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी शहरात पुन्हा लॉकडाऊन अथवा नाईट कर्फ्यू लागू होण्याच्या चर्चांना उधाण आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत नाइट कर्फ्यू लागू करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे संकेत दिले आहे. तसेच संसर्ग वाढल्यास लॉकडाऊनची भीती आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्यासाठी सर्व मुंबईकरांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे व नियम पाळले पाहिजेत, असे आवाहन देखील किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

बाजारांचे स्थलांतर

शहरातील बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढत आहेत. त्यामुळे आता बाजारांचेही स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे दादर येथील भाजी व फुल बाजार मध्यवर्ती ठिकाणी असून खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असल्याने त्यामुळे हे दोन्ही बाजार बीकेसीतील एमएमआरडीए व सायन येथील सोमय्या मैदानावर हलवण्यात येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com