रिलायन्समध्ये मोठा नेतृत्वबदल होणार? मुकेश अंबानींनीच दिले संकेत
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व उद्योगसमूहांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि रिलायन्समध्ये आता मोठा नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. याचे खुद्द रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी यांनीच याचे संकेत दिले आहे.
मुकेश अंबानींनी रिलायन्स फॅमिली डेच्या निमित्ताने रिलायन्स समूहातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि भागधारकांशी संवाद साधला. भविष्यात रिलायन्सची वाटचाल कशा पद्धतीने होईल, याविषयी त्यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी रिलायन्समध्ये मोठे नेतृत्वबदल होणार असल्याचं संकेत दिले आहेत. म्हणूनच आता अंबानी कुटुंबाची तिसरी पिढी उद्योगविश्वात नाव मोठं करण्यासाठी टेकओव्हर करण्याची शक्यता आहे.
मुकेश अंबानी म्हणाले की, मोठी स्वप्न आणि अशक्य वाटणारी ध्येयं पूर्ण करण्यासाठी योग्य व्यक्ती आणि योग्य नेतृत्व असणं आवश्यक असतं. रिलायन्स सध्या अशाच प्रकारच्या मोठ्या नेतृत्वबदलाच्या प्रक्रियेमध्ये आहे. हा बदल माझ्या पिढीच्या ज्येष्ठांकडून पुढच्या पिढीच्या तरुण नेतृत्वाकडे होईल. "पुढच्या पिढीचं नेतृत्व म्हणून आकाश, इशा आणि अनंत रिलायन्सला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जातील याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही".