महाराष्ट्र
Local Restart । दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल सुरु होणार ? राजेश टोपे म्हणाले…
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी प्रवाशी व विरोधी पक्षांकडून मागणी होत आहे. या मुद्यावर सुद्धा आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली. या मुद्द्यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी कधी मिळणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच राहिला आहे. "मुंबईत करोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र, या सगळ्याचं नियोजन करण्याचा भाग हा रेल्वेच्या अखत्यारीत असणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील", असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.