नथुराम गोडसेची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध; जितेंद्र आव्हाड आक्रमक
राष्ट्रवादी खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी साकरलेल्या नथुराम गोडसे या भूमिकेवरून आता राजकीय वर्तुळात वादंग माजला आहे. राष्ट्रवादीतच एकीकडे समिश्र प्रतिक्रिया येत असताना आता तिखट प्रतिक्रिया सूरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेत कलाकारांचा वेष घेऊन गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही, सिनेमाला विरोध करणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
मी गेले 20 ते 25 वर्षे गांधी विरोधाच्या चित्रपटांना विरोध केला तो एक वैचारिक विरोध आहे. खासदार यांनी हि भूमिका स्वीकारली हेच चुकीच आहे.कलाकाराने समाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणालेत. तसेच गांधींचा खून करणाऱ्या नथुरामची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध आहे. कुठलाही कलाकार एखादी भूमिका करतो तेव्हा ती भूमिका अंगात उतरवत असतो. भूमिका आणि माणूस हे वेगळं असू शकत नाही. त्यामुळे वर्ष कोणतेही असो विरोध हा विरोध असणारच अशी आक्रमक पावित्रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला.
नथुराम महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. त्यामुळे व्यक्ती चारित्र्य स्वीकारत असताना ते उतरतच मग ते वेगळ कसं असेल असेही ते म्हणाले. नथुरामचा उदात्तीकरण जो करेल त्याला माझा विरोध असेल. पक्षाच यात काही घेणं देणं नाही, हि माझी वयक्तिक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आज दुपारी अमोल कोल्हे आणि जितेंद्र आव्हाड यांची भेट झाली. या भेटीवर आव्हाड म्हणाले, ते मला भेटले तेव्हा मी त्यांना सांगितलं कि, मला विरोध करावं लागले, अशी भुमिका त्यांनी घेतली. तसेच कलाकार म्हणून अमोल कोल्हे महान आहेत पण त्यांनी हि भूमिका स्वीकारली नव्हती पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.