स्टेट बँकेच्या कामचोर कर्मचाऱ्यांची तक्रार नेमकी कोठे करायची?

स्टेट बँकेच्या कामचोर कर्मचाऱ्यांची तक्रार नेमकी कोठे करायची?

Published by :
Published on

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणुन ओळखली जाणरी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा व्याप जितका मोठा तितकीच त्याची कामेही रटाळ पद्धतीची असतात. म्हणुन प्रत्येक बँकेच्या शाखेत ग्राहकांच्या अनेक तक्रारी असतात.अशा तक्रारींना वरिष्ठांनकडून फक्त उडवा-उडवीची उत्तरे नाहीतर दुर्लक्ष केले जाते.

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा सोशल मिडीयावर अनेकदा विनोद बनला जातो आणि अशा विनोदावर लोकही भरभरुन प्रतिसाद देतात. मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकांकडून याची दखल घेण्यात आली आहे. जर ग्राहकांना बँकेतील कर्मचारी कामचुकार कामे करत असतील किंवा कामात दिरंगाई करत असतील तर कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने कामचोर कर्मचाऱ्यांची तक्रार करण्यासाठी पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलवर जाऊन बँकेचे ग्राहक कोणत्याही कर्मचाऱ्याने योग्य वागणूक किंवा सहकार्य न केल्यास एसबीआयच्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात.

कर्मचाऱ्याची तक्रार कशी कराल?

बँकेच्या कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी https://cms.onlinesbi.com/CMS याठिकाणी जाऊन तक्रार नोंदवता येईल. संकेतस्थळावर गेल्यानंतर General Banking पर्याय क्लिक करावा, त्यानंतर Branch Related पर्याय निवडावा. त्यामध्ये तुम्ही आपली तक्रार नमूद करु शकता. आता या तक्रारींची बँकेकडून कितपत दखल घेतली जाणार, हेदेखील पाहावे लागेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com