तलाठी परिक्षेत गोंधळ; काय आहे उद्याचं वेळापत्रक? जाणून घ्या वेळ

तलाठी परिक्षेत गोंधळ; काय आहे उद्याचं वेळापत्रक? जाणून घ्या वेळ

राज्य शासनाच्या वतीनं तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत आज सर्व्हर डाऊन झाल्यानं ठिकठिकाणी गोंधळ उडाला होता. यामुळे उद्याबाबत विद्यार्थ्यांध्ये कोणाताही गोंधळ होऊ नये यासाठी पत्रक काढण्यात आले आहे.
Published on

मुंबई : राज्य शासनाच्या वतीनं तलाठी भरतीसाठी घेण्यात येत असलेल्या ऑनलाईन परीक्षेत आज सर्व्हर डाऊन झाल्यानं ठिकठिकाणी गोंधळ उडाला होता. ऐनवेळी सर्व्हर डाऊन झाल्यानं पहिल्या सत्राची परीक्षा तब्बल दीड तासानं उशिरानं सुरु करण्यात आली. त्यामुळं दुसऱ्या सत्राची ऑनलाईन परीक्षाही लांबणीवर पडली होती. उद्याबाबत विद्यार्थ्यांध्ये कोणाताही गोंधळ होऊ नये यासाठी पत्रक काढण्यात आले आहे.

तलाठी परिक्षेत गोंधळ; काय आहे उद्याचं वेळापत्रक? जाणून घ्या वेळ
23 ऑगस्टला उतरू शकले नाही तर पुढे काय होणार? इस्रोच्या शास्त्रज्ञाने सांगितले

तलाठी परिक्षेचा सकाळी नऊचा पेपर होता, पण सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली. तलाठीच्या परीक्षेत सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थी खोळंबले. त्यामुळे आता तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला होता. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. परंतु, आता उद्या होणाऱ्या तलाठी परिक्षाबाबत आधीच पत्रक जाहीर करण्यात आले आहे.

तलाठी सरळसेवा भरतीच्या परीक्षेदरम्यान आज टीसीएसच्या डेटा सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही परीक्षा विलंबाने सुरु झाली. मात्र, उद्या तिन्ही सत्रातील उमेदवारांनी प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या विहित वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे परिक्षा केंद्रांवर एक तास आधीच सर्व कागदपत्रांसहित उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com