महाडला महापूराचा फटका नेमका कशामुळे बसतोय जाणून घ्या
सावित्री नदी महाबळेश्वर इथं उगम पावते आणि अरबी समुद्राला येऊन मिळते. यादरम्यान तिची लांबी कमी आहे. आणि तीव्र उतार असल्याने प्रचंड वेगाने पाणी वाहत येते. त्यासोबत माती मोठ्या प्रमाणावर वाहून आणते. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे सुरू आहे. हा गाळ वाढल्याने पाणी महाड शहरात शिरत असते. मुंबई गोवा महामार्गाच्या पुलांचे बांधकाम झालं आहे. त्यामुळे पाण्याचे प्रवाह अडले आहेत. त्यामुळेच महाड मधील पाण्याची पातळी यंदा अधिक वाढली आहे.
पुराची समस्या कमी करायची असेल तर नदीतील गाळ काढला पाहिजे. ते झाल्यास पात्र खोल होईल आणि पुराच्या पाण्याची उंची कमी होईल. सावित्री नदीतील बेट काढून टाकली पाहिजेत. दुसरीकडे सावित्री नदी बरोबरच तिच्या उपनद्या गांधारी आणि काळ यांचे पाणी नदीत किती येत याचा अभ्यास व्हायला हवा त्यासाठी त्यांचा टोपो ग्राफीकल सर्व्हे होणं गरजेचं असल्याचे मत सावित्री नदीचे अभ्यासक डॉक्टर समीर बुटाला यांनी व्यक्त केले आहे.