वेंकीज कंपनीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला हिरवा कंदील; माणगाव खोराला फायदा

वेंकीज कंपनीचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला हिरवा कंदील; माणगाव खोराला फायदा

Published by :
Published on

समीर महाडेश्वर | केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा होईल असा दावा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केला होता. यानुसार प्रसिद्ध वेंकीज कंपनी अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव खोरात येणार आहे. वेंकीज कंपनीने सिंधुदुर्ग जिल्हात काम करण्यासाठी हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिली आहे.

वेंकीज कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देणार अशी घोषणा विशाल परब यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी विशाल परब यांनी दिल्लीमध्ये नारायण राणे यांची भेट घेत वेंकीज कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावी यासाठी नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. वेंकीज कंपनीही कोंबडी उद्योगातील भारतातील नंबर एक ची कंपनी असून ती माणगाव खोऱ्यामध्ये उद्योग सुरू करण्यास उत्सुक आहे. माणगाव खोऱ्यात आणण्यासाठी नारायण राणे 2009 पासून प्रयत्न करत होते. माणगाव खोऱ्यासह जिल्ह्यातील हजारो तरुणांना यामुळे रोजगार मिळणार आहे असा दावा परब यांनी केला आहे. माणगाव खोऱ्यात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचे उत्पादन होते आणि त्याची वाहतूक गोवा आणी कर्नाटक राज्यात केली जाते.ह्या कंपनी मुळे हा भागात मोठा रोजगार निर्माण होईल असा दावा परब यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com