Weather Alert | पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातून पाऊस गायब झाला होता. पण नैऋत्येडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे सरकरण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1 जुलैपर्यंत संबंधित राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकचा समावेश आहे. याशिवाय, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीतही जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासोबत बर्फवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीत 2 आणि 3 जुलैला पाऊस होऊ शकतो. पुढील काही तासांत सिक्कीम, आसामच्या काही भागात, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मराठवाड्याच्या काही भागात सौम्य आणि मध्यम पावसाची शक्यता आहे.उत्तराखंडचा काही भाग, बिहारमधील उत्तर भागातील जिल्हे, पश्चिम बंगाल, विदर्भाचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि छत्तीसगडचा काही भागात सौम्य ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. झारखंड आणि अंदमान व निकोबार द्वीप समुहात सौम्य आणि काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.