बेळगाव सीमाप्रश्नी लवकर तोडगा काढू, शरद पवार यांचे आश्वासन
नंदकिशोर गावडे, बेळगाव | बेळगाव सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील पाठपुरावा करू असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. बेळगाव मधील पत्रकार व माजी जिल्हा परिषद सदस्या सरस्वती पाटील यांनी बारामती याठिकाणी भेट घेत पुढाकार घेऊन सीमाप्रश्नवर लवकर तोडगा काढावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली. यावर शरद पवार यांनी दिवाळीनंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तातडीने पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
काही दिवसापूर्वी खानापूर समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी कोल्हापुरात ठिय्या आंदोलन केले होते. 1993 चा तोडगा काय?? यावर सीमाभागात मोठी चर्चा सुरू आहे या तोडग्यावर स्पष्टीकरण देत असताना पवार म्हणाले कि "तोडगा अस्तित्वात आणण्या सारखी परिस्थिती तेव्हा होती त्यावेळी मी सत्तेत मजबूत होतो आणि कर्नाटकातील वातावरणही त्या दृष्टीने पोषक होते.मात्र आता कर्नाटकात आणि केंद्रात असलेले भाजप सरकारला या प्रकरणी कोणतीही सहानुभूती असेल असे वाटत नाही त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतले जातील असे त्यांनी सांगितले.यावेळी अमित देसाई यांनी आनंद मेनसे लिखित सीमाप्रश्न बद्दलचे पुस्तक शरद पवार यांना दिले.