आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा दावा

आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा दावा

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क | एल्गार परिषदेत अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप या प्रकारावर आक्रमक झाला असुन शरजीलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यात आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आम्ही हिंदुंचा अपमान केला नसल्याचा दावा केला आहे.

शरजील उस्मानीच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी, सडक्या डोक्याचा इसम महाराष्ट्रात येऊन हिंदूंना सडका म्हणत असेल तर भाजप स्वस्थ बसणार नाही. तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली नाही तर त्याविरोधात आम्ही आंदोलन करु,' असा इशारा त्यांनी दिला होता.

यावर देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल कोळसे-पाटील उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून स्वत:चं मुख्यमंत्रीपद पणाला लावलं, असा घणाघातही कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर केला.

शरजीलच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागतो. शरजीलने हिंदू ऐवजी मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता. मात्र, मी त्याचा निषेध करणार नाही आणि त्याच्या वक्तव्याचं समर्थनही करणार नाही, असं कोळसे-पाटील म्हणालेत. राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारेही हिंदूच आहेत. आमच्यार गुन्हे दाखल करायचे असतील तर करावेत. आमची भाषणं तपासावीत, आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, असा दावाही कोळसे पाटील यांनी यावेळी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com