ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद

ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद

ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे नागरीकांना आवाहन केले आ
Published on

ठाणे : ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे नागरीकांना आवाहन केले आहे.

ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद
'जनाब ठाकरे' म्हणत बावनकुळेंकडून उध्दव ठाकरेंवर टीका; काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून...

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उथळसर प्रभाग समिती अंतर्गत जलकुंभाची इनलेट जलवाहिनी ही के-व्हीला नाला येथील पुल प्रकल्पाच्या कामात 500 मिमी व्यासाची इनलेट जलवाहिनी बाधित होत असल्याने सदर बाधित जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम सुरु आहे.

याच कारणामुळे ठाणे शहरात शनिवार 6 मे रोजी सदर जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्याचे काम हाती घेतल्याने सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत उथळसर प्रभाग समिती मधील जलकुंभ अंतर्गत श्रीरंग सोसायटी परिसर, राबोडी 1, राबोडी 2, पंचगंगा, आकाशगंगा, के-व्हीला परिसर, पोलीस लाईन, टेंभीनाका, सिव्हील हॉस्पिटल, ठाणे जेल, आरटीओ परिसर, कॅसल मिल, धोबी आळी व उथळसर परिसर इ. भागांचा पाणी पुरवठा 12 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे नागरीकांना आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com