जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज कर्नाटक दौऱ्यावर

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज कर्नाटक दौऱ्यावर

Published by :
Published on

अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे अनेक भागांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. म्हणूनच या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आज बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. यासाठी जयंत पाटील कर्नाटक दौऱ्यावर जात आहेत.

जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना सोबत घेऊन ही चर्चा केली जाणार आहे. ही चर्चा थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याशी होणार आहे. त्यासाठी त्यांनी आज सकाळी १०.३० वाजताची वेळ दिल्याचेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com