मुंबईतील पाणी कपात 'या' तारखेपासून घेण्यात येणार मागे

मुंबईतील पाणी कपात 'या' तारखेपासून घेण्यात येणार मागे

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर ही चार जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत.

आज सकाळी 6 वाजेपर्यंत पाणीसाठा 66.77 टक्के इतका नोंदवण्यात आला असल्याची माहिती मिळत असून याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरच्या पाणीपुरवठ्यात सध्या लागू असलेली 10 टक्के पाणी कपात ही सोमवार दिनांक 29 जुलै पासून मागे घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभागातील ग्रामपंचायतींना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होणा-या पाणीपुरवठ्यातील १० टक्के कपात देखील सोमवार दिनांक 29 जुलैपासून मागे घेण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com