“विणेकरी आणि अश्वाला परवानगी द्यावी”, वारकऱ्यांची मागणी
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या 430 दिंड्यांच्या प्रतिनिधींची पंढरपुरात बैठक संपन्न झाली. यावर्षीच्या पालखी सोहळ्यामध्ये प्रस्थानासाठी विणेकऱयाना सुद्धा उपस्थित राहण्याची आणि अश्वाला देखील परवानगी देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
या वर्षीच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी शासनाने आदेश काढल्यानंतर ही संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांनी आणखीन काही मागण्या शासनाकडे केलेले आहेत. या संदर्भामध्ये आज पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे दिंडीचे प्रमुख आणि संस्थांनचे प्रमुख यांची बैठक झालेली आहे.
पालखी प्रस्थान सोहळ्याला शासनाने शंभर वारकऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये जवळपास 430 दिंड्या असतात. या दिंडीतील प्रत्येक विणेकऱ्याला म्हणजे आणखी 430 लोकांना प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी देण्याची मागणी शासनाकडे केलेली आहे. सोबतच शितोळे सरकार यांच्या अश्वाला प्रस्थान वेळी उपस्थित राहण्याची तसेच वाखरी पासून पंढरपूर पर्यंत होणाऱ्या पायी वारी मध्ये सहभागी या अश्वाला परवानगी देण्याची मागणी केलेली आहे.
आजच्या बैठकीमध्ये अनेक दिंडी प्रमुखांनी शासनाकडे पायीवारी काढण्यासाठी पाठपुरावा करण्याचा आग्रह धरलेला आहे. मात्र संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांची जी काही भूमिका असेल असे सर्वानुमते ठरले आहे.