लंडनहून वाघनखं मुंबईत येण्यास उशीर होणार

लंडनहून वाघनखं मुंबईत येण्यास उशीर होणार

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला. १६ नोव्हेंबर या दिवशी ही वाघनखे मुंबईत आणली जाणार होती. मात्र लंडनहून वाघनखे मुंबईत येण्यास उशीर झाला आहे.

लंडनच्या वस्तुसंग्रहालयात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात येण्यास विलंब होणार आहे. वाघनखे राज्यात येण्याचा नोव्हेंबर, जानेवारीचा सरकारने दिलेला वायदा चुकला असून आता मे महिन्यात वाघनखे मुंबईत येण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

सरकारमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात येत आहे. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखे राज्यात आणण्याबाबत मोठी प्रसिद्धी केली होती. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात आणि त्यानंतर जानेवारीमध्ये वाघनखे भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता ती मे महिन्यात महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com