विश्रांतीसाठी विठुराया गेले गोपाळपुरी

विश्रांतीसाठी विठुराया गेले गोपाळपुरी

मराठी महिन्यानुसार सध्याच्या मार्गशीर्ष महिन्यात विठुराया हा विश्रांतीसाठी गोपाळपूरी जाऊन पोहोचले आहे. मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे वास्तव्य हे मंदिरात नसून गोपाळपूर जवळच्या विष्णूपदावर असते.
Published by :
shweta walge
Published on

पंढरपूर: मराठी महिन्यानुसार सध्याच्या मार्गशीर्ष महिन्यात विठुराया हा विश्रांतीसाठी गोपाळपूरी जाऊन पोहोचले आहे. मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे वास्तव्य हे मंदिरात नसून गोपाळपूर जवळच्या विष्णूपदावर असते. मंदिराप्रमाणेच विष्णू पदावर देखील विठ्ठलाचे पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्व राजोउपचार होतात. त्यामुळे सध्या भाविकांची मंदिर सोबत चंद्रभागेकाठी असणाऱ्या विष्णूपदावर मांदियाळी होताना दिसत आहे.

पाण्याने चारही बाजूने व्यापलेले हे मंदिराचे स्थान हे निसर्गाच्या सानिध्यात असल्याने याठीकानच्या प्रसन्नमयी वातावरणाकडे भाविक हे आकर्षित होतात.

आशी आहे आख्यायिका

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी साक्षात पांडुरंग उपस्थित होते. माऊलींसारखा आपला लाडका फक्त समाधीस्थ झाला. त्यामुळे विरहाने आळंदीहून पंढरपुरात परतलेले पांडुरंग थेट गोपाळपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर वास्तव्यास गेले. पांडुरंगाने तिथे गाई गोपाळासह एक महिना वास्तव्य केले. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे विष्णूपदावर वास्तव्य असते. अशी आख्यायिका रूढ आहे. तर , रुक्मिणी मातेच्या शोधार्थ आलेल्या कृष्णाने गायी गोपकासह चंद्रभागेच्या काठावर वेणूनाद केला. ते स्थान म्हणून देखील विष्णूपद प्रचलित आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com