आंबेडकरी विद्यार्थ्यांचे रोहित वेमुलांच्या 8 व्या स्मृतीदिनी तीव्र आंदोलन
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याची 17 जानेवारी 2016 रोजी संस्थात्मक खून करण्यात आला. त्याच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना आद्यपही शासन न झाल्याने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेट वर आज आंबेडकरी विद्यार्थी, कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करण्यात आले. दलितांच्या आरक्षणावरून द्वेष पसरवून दलित विद्यार्थ्यांना भेदभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत भाजप व मोदी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
भाजप प्रणित सरकार सत्तेत आल्यापासून शिक्षण क्षेत्रात जातीयवाद बोकाळला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवले जात आहे, जातीवरून हिनविल्याने अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून परावृत्त होत आहेत, सरकारी शिक्षण संस्थांमध्ये नौकर भरती बंद असल्याने गरिबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, गरिब- मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकू नये अशी व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणात केली असल्याने हे धोरण रद्द करावे अशी घोषणा देण्यात आल्या.
भाजप सरकारच्या दबावाखाली विद्यार्थीहिताचे निर्णय घेण्याऐवजी मनमानी कारभार करण्यात सगळेच कुलगुरू मश्गुल आहेत भाजप व अभाविपच्या कार्यकर्त्यांना कुलगुरू केले जात असल्याने शिक्षणात धर्म आणायचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप सचिन निकम यांनी केला.