बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया म्हणाले...

बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार; विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया म्हणाले...

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर रेलरोको आंदोलन करण्यात येत असून रेल्वेसेवा ठप्प आहेत. यावर आता प्रतिक्रिया येत आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे की, बदलापूर मध्ये साडे तीन वर्षाच्या लहान मुलीवर झालेली अत्याचाराची घटना ही महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आहे. या गंभीर प्रकरणाबाबत पोलिस आयुक्त डुंबरे यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली आहे. पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता त्यांना अकरा तास पोलिस स्थानकात बसवून ठेवले गेले.

या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन करावे, ही मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. सदर प्रकरण तीन महिन्यात फास्ट ट्रॅक मध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com