‘तौक्ते नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला’

‘तौक्ते नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला’

Published by :
Published on

तौक्ते चक्रीवादळामुळे (Tauktae cyclone) कोकणातील लोकांचे मोठं नुकसान झालं होतं. या चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला आहे. 170 कोटी 72 लाख 73 हजार रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलाय. हा निधी तात्काळ वितरणाच्या सूचना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत.

वादळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वडेट्टीवार यांनी 4 दिवसांचा कोकण दौरा केला होता. नागरिकांसोबत संवाद साधून वादळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. तो शब्द सरकारने पाळल्याचं यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

वडेट्टीवारांनी 20 ते 22 मे रायगडमधील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कु डाळ, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांचा तीन दिवस दौरा करून लोकांशी थेट संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com