Vidhan Parishad Election : मलिक आणि देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव!
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. तर अनिल देशमुख (Anil Deshmukh) सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपामुळं सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. त्यामुळे दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत यावर सुनावणी पार पडणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपनं या निवडणुकीत ५ जणांना उमेदवारी दिली आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळं विधानपरिषदेसाठी एका मताला देखील महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्यास परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला होता. आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याची माहिती आहे.
अनिल देशमुख, नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव
अनिल देशमुख सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपामुळं सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. तर, मंत्री नवाब मलिक हे देखील ईडी कोठडीत आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात एका खंडपीठापुढं तातडीनं सुनावणी करण्यासाठी सादर करण्यात आली. मात्र, त्या खंडपीठानं या याचिकेवर सरन्यायाधीशांच्यापुढं सुनावणी व्हावी, असं मत मांडलं.