Raj Thackeray
Raj Thackerayteam lokshahi

"प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच भोंग्याची गरज असते?"

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे औरंगाबादला पोहोचण्याआधीच शेअर केला व्हिडिओ
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

मागील काही दिवसांपासून भोंगा प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच चिघळलं आहे. मिशिदीवरील भोंगे काढून टाका यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेआधी मनसेचे कार्यकर्ते मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. पुण्यातून हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंसोबत औरंगाबादला जाणार आहेत. त्यातच आता राज ठाकरे औरंगाबादला (Aurangabad) पोहोचण्याआधीच संदिप देशपांडेंनी भोंगा चित्रपटाचा व्हिडिओ शेअर (video share) केला आहे. तसेच ट्विटकरत प्रार्थना देवापर्यंत पोहोचण्यासाठी खरंच भोंग्याची गरज असते, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' (Bhonga) या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली आहे. चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून, यावर आधारित कथेवर 'भोंगा' हा चित्रपट चित्रित करण्यात आला. ‘धर्मापेक्षा मोठं कोणी नाही, मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल’ अशा वृत्तीला दडपून टाकण्यासाठी सुरु असलेले गावकऱ्यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.

'भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे' हा आशयघन विषय या 'भोंगा' चित्रपटातून 3 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट अमेय खोपकर, संदीप देशपांडे, आणि अमोल कागणे फिल्मस् प्रस्तुत असून, चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे.

काय आहे चित्रपटाचा नेमका आशयघन

'भोंगा' चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. एका कुटुंबातील चिमुकल्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते, या भोवती चित्रपटाचे कथानक फिरते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com