मुंबईत मराठी माणसाला जागा देण्यास नकार; महिलेचा Video करत आरोप

मुंबईत मराठी माणसाला जागा देण्यास नकार; महिलेचा Video करत आरोप

मुलुंडच्या शिवसदन बिल्डिंगमध्ये ऑफिससाठी नाकारली जागा
Published on

राजेश गुप्ता | मुंबई : मुंबईत मराठी माणसाला जागा देण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेनी व्हिडिओतून केला आहे. मुलुंडच्या शिवसदन बिल्डिंगमध्ये ऑफिससाठी जागा नाकारल्याचा प्रकार समोर आला असून तृप्ती देवरुखकर एकबोटे या महिलेचा हा व्हिडीओ आहे. महाराष्ट्रीयन माणसाला इमारतीमध्ये घर देत नाही, असे सांगून घर भाड्याने देण्यास नकार दिल्याचा आणि जाब विचारल्यावर मारहाण केल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर एकबोटे यांनी सोशल मीडियावर केला आहे.

मुलुंड पश्चिमला शिवसदन इमारतीमध्ये ऑफिससाठी भाड्याने जागा पाहण्यास गेले असता घर मालकाने महाराष्ट्रीयन माणसाला घर देणार नाही, असे सांगत धक्काबुक्की केल्याचा आरोप तृप्ती यांनी केला आहे. तसा एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला आहे.

याची माहिती मिळताच मनसे मुलुंड विभाग अध्यक्ष राजेश चव्हाणच्या वतीने मुलुंड मधील मनसैनिकांनी तृप्ती यांच्याशी संपर्क साधून त्यांना घेऊन सदर व्यक्तींना जाब विचारला आणि तृप्ती यांची माफी मागायला लावली. मात्र, या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com