चंद्रपुरात विदर्भवादी संघटना आक्रमक; गांधी पुतळ्यासमोर दिल्या केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी
अनिल ठाकरे, चंद्रपूर | चंद्रपुर जिल्ह्यात विदर्भवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज गांधी पुतळ्यासमोर केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा दहनाच्या आधीच सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान विदर्भातील 11 जिल्ह्यात हे आंदोलन तेवत ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
केंद्र सरकारने लोकसभेत विदर्भ विरोधी उत्तर दिल्याने विदर्भवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. चंद्रपुरात एडवोकेट वामनराव चटप यांच्या नेतृत्वात गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. लोकसभेत विदर्भाच्या मागणीबाबत प्रश्नाला उत्तर देताना तशी मागणी नसल्याचे उत्तर केंद्रीय मंत्र्यांनी दिले होते. या उत्तराचा विदर्भवादी संघटनांनी निषेध केलाय. चंद्रपुरात गांधी पुतळ्यासमोर केंद्र सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. पोलिसांनी मोदी-शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहनाच्या आधीच सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. विदर्भातील 11 जिल्ह्यात हे आंदोलन तेवत ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.