वर्ध्यात 7 लाखाच्या अवैध दारूसाठ्यासह 2 जणांना अटक
भुपेश बारंगे | वर्ध्यात नागपूर चंद्रपूर रोडवरील अवैध दारू जप्त केली.मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर सिंदी पोलिसानी बरबडी शिवारात अवैध दारू साठा वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनाची तपासणी करण्यात आली. दरम्यान 7 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वर्धा जिल्हा तसा दारूबंदी जिल्हा आहे.पोळ्याच्या सण येत असल्याने दारूची साठवणूक करण्यासाठी येत असलेल्या नागपूर चंद्रपूर मार्गावरील बरबडी शिवारात एका वाहनाची तपासनी केली असता सदर वाहनांमध्ये देशीच्या 35 पेट्यां 1680 बॉटल्स कंपनीच्या 25 पेट्यामध्ये 1200 बाँटल्स अशा एकूण 2880 बॉटल्स आढळून आल्या.जवळपास अंदाजे कि. 4,32,000 रू .असा मुद्देमाल व महिंद्रा बोलेरो जुनी वापरती 3,00,000 रू. असा एकुण 7,32,000रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दारुची अवैध वाहतूक करणाऱ्या रोहित कमलाकर पाटील प्रशांत शांताराम नगराळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर मोठी कारवाई सिंदी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी केली.