UPSC Exam; युपीएससीची परीक्षा पुढे ढकलली
केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे हि परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता परीक्षा आता 10 ऑक्टोबरला होणार आहे
केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा कोरोनामुळे लांबणीवर ढकलण्यात आली आहे. 27 जून रोजी होणारी परीक्षा आता 10 ऑक्टोबरला होणार आहे. यापूर्वीही अनेक परीक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होते. मागील वर्षी देखील करोना संसर्गाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ३१ मे रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती, त्यानंतर या परीक्षेचे ४ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते.या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन देखील टाकण्यात आलं आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा -२०२१ आणि भारतीय वन सेवा परीक्षा -२०२१ साठी २४ मार्ज पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.