दिपाली चव्हाण आत्महत्या : रेड्डीच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर सरकार पक्ष बाजू मांडणार

दिपाली चव्हाण आत्महत्या : रेड्डीच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर सरकार पक्ष बाजू मांडणार

Published on

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी यांच्या वकिलानं अचलपूर येथील जलदगती न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर शनिवारी सरकारी पक्षातर्फे तपास अधिकाऱ्यांकडून 'से' दाखल होण्याची शक्यता आहे. दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी वनकर्मचाऱ्यांचा जबाब नोंदविला आहे.

दिपाली आत्महत्या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. धारणी न्यायालयाकडून त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दिपालीनं पत्र लिहून रेड्डी यांच्याकडे शिवकुमारबाबत तक्रार केली होती.

मात्र, रेड्डींनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे रेड्डींच्या अटकेची मागणी होत आहे. त्यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावर आज (3 एप्रिल) सरकारी अभियोक्ता किंवा तपास अधिकाऱ्यांना 'से' दाखल करण्याचे सुचविले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com