”मातोश्रीचा विकास झाला, एकाचे दोन बंगले झाले”; नारायण राणेंची जळजळीत टीका

”मातोश्रीचा विकास झाला, एकाचे दोन बंगले झाले”; नारायण राणेंची जळजळीत टीका

Published by :
Published on

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेत नागरीकांना संबोधित करताना शिवसेनेवर घणाघाती टीका केली. 32 वर्ष शिवसेनेने मुंबई महापालिकेत सत्ता गाजवली, काय बदल झाला ? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. तसेच मातोश्रीचा विकास झाला एकाचे दोन बंगले झाले, मात्र लोकांची दोन घरे ही झाले नसल्याची त्यांनी टीका केली.

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आज सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुरु झाली. नारायण राणे यांनी चैत्यभूमीवर येण्यापूर्वी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकेर यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.

नारायण राणे यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. बाबासाहेबांनी देशाला जे काय दिलंय त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. अभूतपूर्व आहे त्यांनी देशाला घटना दिली. घटनेप्रमाणं देश चालतो, आम्ही रोज घटनेप्रमाणं काम करतो. गरीबांनी शिक्षण घ्यावं, शिस्त लावली. बाबासाहेब तुमचे आशीर्वाद माझ्यावर राहू देत, अशा शब्दात नारायण राणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com