केंद्रीय मंत्री कपिल पाटील दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह
अभिजीत हिरे, भिवंडी | भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे बुधवारी कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान पाटील यांची प्रकृती उत्तम असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली घरातच त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. यापूर्वी देखील कपिल पाटील यांना कोरोनाची बाधा झाली होती.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने कोरोनाची काही लक्षणे दिसताच मी स्वतःची कोरोना चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट पॉजिटिव आला आहे. परंतु माझी प्रकृती उत्तम आहे. मी स्वतःला डॉक्टरांच्या देखरेखी खाली होम क्वारंटाइन करून घेतले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी, अशी विनंती करतो असे आवाहन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी नागरिकांना केले आहे.