केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार महाराष्ट्र दौऱ्यावर
केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा ते आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार महाराष्ट्र दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होणार आहे. सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे.
या बैठकीत निवडणुकांच्या संदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. 27 ते 28 सप्टेंबर असा दोन दिवसीय त्यांचा दौरा होणार आहे. काल रात्री 8 वाजता मुंबई विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
यासोबत निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचा शिष्टमंडळात समावेश असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे.