मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार बजेट
मोदी 3.0 सरकारचं आज पहिलं बजेट सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार असून सकाळी 11 वाजता बजेट सादर होईल. अर्थमंत्री सीतारामन या सलग सातवा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
या बजेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी, महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून रेल्वेसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. करदात्यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष लागले आहे. शेअर बाजारात प्रचंड चढ उतार होण्याची शक्यता आहे.
यासोबतच मोरारजी देसाई यांच्यानंतर 11 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम निर्मला सितारामण यांच्या नावावर नोंदवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या बजेटमध्ये काय काय घोषणा होणार हे पाहणं आता महत्वाचे असणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी, 22 जुलैपासून सुरुवात झाली असून हे अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.