घरगुती वादातून काकाने एका वर्षाच्या बाळाला टाकले विहिरीत

घरगुती वादातून काकाने एका वर्षाच्या बाळाला टाकले विहिरीत

साताऱ्यातील देगाव येथे घडला हा संपूर्ण प्रकार
Published by :
Sagar Pradhan
Published on

प्रशांत जगताप | सातारा : साताऱ्यात आज काका पुतण्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. देगाव येथे १ वर्षाच्या बाळाला काकाने विहिरीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. आज (६ ऑगस्ट) सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

घरगुती वादातून काकाने एका वर्षाच्या बाळाला टाकले विहिरीत
उदय सामंत हल्याप्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखासह 5 जणांना न्यायालयीन कोठडी

काकाने सातारा एमआयडीसी कॅनॉलजवळ दत्तनगर येथे विहिरीत बाळाला टाकून दिले. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. शलमोन मयूर सोनवणे असे मृत बाळाचे नाव आहे. संशयित आरोपी अक्षय मारुती सोनवणे असे त्या निर्दयी काकाचे नाव आहे.

घरगुती वादाच्या करणातून त्याने बाळाला विहिरीत टाकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याला घरातून नेत हे अमानुष कृत्य आरोपीने केलं आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून बाळाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. सातारा तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत अधिक तपास करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com