उल्हासनगरमध्ये शुल्लक वादातून व्यापाऱ्याला जीवघेणी मारहाण

उल्हासनगरमध्ये शुल्लक वादातून व्यापाऱ्याला जीवघेणी मारहाण

Published by :
Published on

मयुरेश जाधव । उल्हासनगरमध्ये शुल्लक वादातून व्यापाऱ्याला जीवघेणी मारहाण झाल्याची घटना घडली आहे. अजय माखीजा असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्याच्यासोबत आणखीन एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी आता उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दुकानासमोर गाडी लावण्याच्या वादातून शेजारील व्यापाऱ्यांनी अजय माखीजा यांना मारहाण केल्याची घटना घडली. फर्निचर मार्केट परिसरात आज संध्याकाळी घडली घटना घडली आहे. या मारहाणीत अजय माखीजा हे गंभीर जखमी आहेत तर अन्य एक जण किरकोळ जखमी आहेत. या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com