उल्हासनगरात मद्यधुंद तरुणीचा दारू पिऊन धिंगाणा

उल्हासनगरात मद्यधुंद तरुणीचा दारू पिऊन धिंगाणा

Published by :
Published on

मयुरेश जाधव | उल्हासनगरात 'पापा की परी' चा भररस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारच्या ओटी सेक्शन दरम्यान हा प्रकार घडलाय. या घटनेचा व्हिडीअो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारच्या ओटी सेक्शन दरम्यान एक तरुण आपल्या परिवारासह या रस्त्यावरून कारने जात असताना अचानक एक तरुणी गाडीसमोर आली आणि गाडीवर हात आपटत शिवीगाळ करू लागली. काही तरुणाने तरुणीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी पूर्णपणे नशेत होती. यानंतर या तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या आणखी काही जणांना शिवीगाळ केली. हा प्रकार तासभर सुरू होता आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com