महाराष्ट्र
#BreakTheChain | शिवभोजन थाळी पुढील एक महिना मोफत मिळणार
कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस उद्रेक होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यानंतर राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४ एप्रिलपासून रात्री ८ वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.
- लॉकडाऊन जाहीर झाल्यास नियम काय असू शकतात
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री साडेआठ वाजता घोषित करु शकतात.
- या ब्रेक द चेन लॉकडॉऊनमध्ये केंद्राने लॉकडाऊन लावताना ज्या चुका केल्या, त्या टाळण्याचा प्रयत्न
- हा लॉकडाऊन 15 दिवसांचा असू शकतो, यामध्ये केवळ आपत्कालीन सेवा सुरु राहतील
- मॉल्स,दुकाने बंद होऊ शकतात पण जीवनावश्यक वस्तूंची दुकानांना परवानगी असू शकते
- किराणामाल, भाजीपाल्याची दुकानं सुरु राहण्याची शक्यता
- जिल्हानिहाय बेडची संख्या दोन-तीन दिवसात वाढवण्याची शक्यता
- जिल्हा पातळीवरच्या सीमा बंद केल्या जाऊ शकतात
- मुंबई लोकलबद्दल सध्या विचार सुरु आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
- आज राज्यात ६० हजार १२१ कोरोना बाधित रुग्ण
- सध्या राज्यात भयानक रुग्णवाढ
- रुग्णवाढीमुळे सुविधांवर ताण येतोय
- राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय
- युद्ध पुन्हा एकदा सुरू झालं आहे
- ऑक्सिजनसाठी पंतप्रधान नरेंद मोदींना विनंती
- लवकरच तुटवड्यावर मात करू
- ऑक्सिजनचा साठयांसाठी इतर राज्यांना मदतचे आवाहन
- रोज सव्वा दोन लाख चाचण्या करत आहोत
- हवाईमार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा विचार हवा
- ऑक्सिजनसाठी लष्कराची मदत महत्वाची
- GST परताव्याला मुदतवाढ हवी मुख्यमंत्र्याची केंद्राकडे मागणी
- लसीकरणाचा वेग वाढवणं महत्वाचे
- लसीकरणामुळे तिसरी लाट मंदावेल
- रोज रुग्णसंख्या कितीने वाढेल हे सांगता येत नाही
- ब्रिटनसारखे वेगाने लसीकरण होणे गरजेचे
- लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आवाहन
- कोरोनावर जिद्दीने मात करावी लागणार
- वाढवलेली आरोग्य सेवा देखील कमी पडतेय
- सर्व स्वयंसेवी संस्थांनी पुढे येवून मदत करावी
- सुविधा वाढवू पण डॉक्टर कमी आहेत
- मेडिकल विद्यार्थांना मदतीचे आवाहन
- निवृत्त डॉक्टरांनी ही पुढे येण गरजेच आहे
- जीव वाचन गरजेच आहे म्हणून निर्बंधात वाढ
- उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कडक निर्बंध
- राज्यात कडक निर्बंध
- राज्यात पुढील 15 दिवस राज्यात संचारबंधी
- राज्यात उद्या 8 वाजल्यापासून १४४ कलम लागूफेरीवाले
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद
- अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी बस लोकल सुरू
- पावसाळा पूर्वी काम सर्व सुरू
- जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन
- हवाई वाहतूक, बस सेवा सुरू राहणार
- रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्याला सकाळी 7 ते 8 खाद्य विकण्याची मुभा
- पेट्रोल पंप, कार्गो सेवा सुरूच राहतील
- अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गरिबांना प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि २ किलो तांदूळ देणार
- शिवभोजन थाळी पुढील एक महिना मोफत मिळणार
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांना १५०० रुपये मिळणार
- अधिकृत फेरीवाल्यांना १५०० रुपये बँकेत येणार
- रिक्षावाल्यासाठी १५०० रुपये देणार
- खावटी योजनेतील आदिवासी कुटुंबातील लोकांना २००० रुपये मिळणार
- बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना राहण्याची सोय
- तात्काळ मदतीसाठी 3 हजार 300 कोटी राखीव
- अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद