CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackerayTeam Lokshahi

Uddhav Tahckeray : उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला, राज ठाकरेंवर बोलणे टाळले

एमआयएम प्रमुख असुउदीन ओवेसी यांच्यावर टीका टाळली
Published by :
Team Lokshahi
Published on

Uddhav Balasaheb Thackeray : शिवसेना नेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होत आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची तयारी सुरु होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांची सभा भव्य होण्यासाठी शिवसेनेने पुर्ण ताकद लावली. सभेत भाजपवर जोरदार हल्ले उद्धव ठाकरे यांनी चढवले.

CM Uddhav Thackeray
UddhavTahckeray : संभाजीनगर नामकरणाच्या नावावर उद्धव ठाकरे यांची गुगली

मुख्यमंत्र्यांनी सभेत भाजपलाच लक्ष केले. अगदी बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला किती मोठे केले. त्यांच्यांसाठी कधी पदे पहिली नाही. त्यानंतर भाजपने शिवसेनेला कसा दगा दिले, हे सूत्र पुन्हा सभेत मांडले. भाजपवर टीका करतांना ज्यांच्याबरोबर आयुष्यभर लढत राहिले त्या पक्षांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रसंग आला. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार व्यवस्थित सुरु असून भाजपचा आक्रोश चालला आहे, तो केवळ सत्तेसाठी. काश्मीर प्रश्नावर ताजमहालपर्यंत महागाईपासून शेतकऱ्यांच्या विषयांपर्यंत सर्वच विषयांना केंद्र सरकारला जबाबदार ठरवत जोरदार टीका भाजपवर केली.

राज ठाकरेंवर टीका टाळली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुमारे तासभर भाषण केले. त्यांचा भाषणाचा मुख्य रोख भाजप होता. तसेच या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यांवर टीका टाळली. तसेच राज्यसभे निवडणुकीची पार्श्वभूमी पाहून एमआयएम प्रमुख असुउदीन ओवेसी यांच्यावर टीका टाळली.

औरंगाबादमध्ये राज यांनी टीका टाळली होती...

गुडीपाडव्याच्या सभेत पहिल्यांदा राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्या उपस्थित केला होता. या सभेत त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला होता. ठाण्याच्या सभेत देखील त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. परंतु औरंगाबादच्या सभेत मात्र राज ठाकरे यांनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीच बोलले नव्हते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com