ठाकरे आणि थोरांतामध्ये जागावाटपाबाबत अडीच तास चर्चा, चर्चेत काय घडलं?

ठाकरे आणि थोरांतामध्ये जागावाटपाबाबत अडीच तास चर्चा, चर्चेत काय घडलं?

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीय. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील काही जागांवर अजूनही मतभेद आहेत.
Published by :
shweta walge
Published on

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीय. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील काही जागांवर अजूनही मतभेद आहेत. अशातच आज काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

काँग्रेसने ठाकरे गटासोबत सुरू असलेला वाद संपवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस हायकमांडने चर्चेची जबाबदारी सोपवली. आज बाळासाहेब थोरात यांनी सकाली सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवारांसोबत चर्चा केल्यानंतर थोरात यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, आमच्यात कोणताही वाद नाही, एकत्र बसून मार्ग काढू. ठाकरेंच्या मनात काय आहे, पवारांना काय वाटतं हे या बैठकीत समजून घेतलं. उमेदवारांची यादी कधीही येऊ शकते. साडेतीन वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे, या बैठकीमध्ये चर्चा करू असं थोरात यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com