कोकणातील रिफायनरी प्रकल्प तीन टप्प्यात होणार? उदय सामंत यांनी सांगून टाकलं...

कोकणातील रिफायनरी प्रकल्प तीन टप्प्यात होणार? उदय सामंत यांनी सांगून टाकलं...

सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज रविवार, १५ ऑक्टोबर रोजी मुंबईत 'लोकशाही सहकार उद्योग संवाद' या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सहकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज रविवार, १५ ऑक्टोबर रोजी मुंबईत 'लोकशाही सहकार उद्योग संवाद' या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उद्योग व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मुलाखत घेतली.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, ५ हजार एकर जमीन बारसूच्या प्रकल्पाला लागणार. शेतकऱ्यांना समजवायला आहे. कातळ शिल्प आम्ही घेणार नाही. कुठेही दबाव आणला जाणार नाही. रिफायनरी पाहिजे हे सांगताना आम्ही शेतकऱ्यांना समजावू. रिफायनरीचा पहिला प्रकल्प गुजरातला. पर्यावरणाशी निगडीत प्रकल्प कोकणात हवेत. मला असे वाटते चांगल्या गोष्टींचे समर्थन केलं पाहिजे. जे विरोध करतात त्यांनीसुद्धा कोकणातील प्रकल्प स्विकारले पाहिजे.

तसेच उदय सामंत पुढे म्हणाले की, एक पक्ष आणि त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. आमदार म्हणतात रिफायनरी पाहिजे आणि खासदार म्हणतात रिफायनरी नको. रिफायनरी तीन टप्प्यात होणार. आता सध्या मातीचे परीक्षण सुरु आहे. आमदार म्हणतात रिफायनरी पाहिजे कारण जनतेचा विकास होईल. कातळ शिल्पाचा मुद्दा पुढे करण्यात आला पण कातळशिल्पाला आम्ही कुठेही हात लावणार नाही. रिफायनरीच्या बाबत जे आम्हाला प्रेसेंटेशन दिले त्यात कुठेही प्रदूषण होईल असं सांगितले नाही आहे. जर प्रदूषण होणार असेल तर आम्ही तात्काळ प्रोजेक्ट थांबवू. असे उदय सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com